आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘Don’t Worry’- IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा.

बऱ्याच वेळेस रेल्वेचे तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही, कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे.

आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे सेवाही सुरू होणार, यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही.

जाणून घ्या याविषयी सविस्तर ?

● वेबसाईट आणि मोबाईल ॲप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे.

● याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल. तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल, त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील.

● तसे याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता, मात्र नव्या फिचरमुळे तिकीट, रद्द केल्यास काही मिनिटातच पैसे त्याच्या खात्यात जमा होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!