औरंगाबादच्या द जैन इंटरनॅशनल स्कूलचं नाव “ब्लॅक लिस्ट” मध्ये, शिक्षण विभागाची कारवाई, काय कारण?

आरटीई नियमांची अंमलबजावणी न करता शाळेत पुस्तके, लेखन साहित्य विक्री आणि दुकान सुरू केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील शहानूरमियाँ दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले आहे. आरटीई नियमांची अंमलबजावणी न करता शाळेत पुस्तके, लेखन साहित्य विक्री आणि दुकान सुरू केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

शाळा यापूर्वीही चर्चेत होती. फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड आणि फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेकडून लाल कार्ड देण्यात आले. विद्यार्थ्यांशी होत असलेल्या भेदभावामुळे पालक संतप्त झाले आहेत. आता आरटीई नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

कारवाई का करण्यात आली?

अमित निर्मलकुमार कासलीवाल आणि इतर तीन पालकांनी शाळेच्या आवारात पुस्तके आणि लेखन साहित्य विकल्याबद्दल द जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विरोधात जिल्हा बाल हक्क परिषद आणि शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर तक्रारदार पालकांचे विद्यार्थी प्रथम श्रेणीत असल्याचे आढळून आले. त्यांना शाळेत पुस्तके खरेदीसाठी 4,700 रुपयांची पावती देण्यात आली. दिलेली पावती आणि घेतलेली वास्तविक रक्कम यामधील पालकांकडून 1,417 रुपये जास्त घेतले असल्याचे आढळून आले.

पालकांकडून साहित्यासाठी घेण्यात आले अतिरिक्त पैसे.

शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या पावतीवर जीएसटी क्रमांकाचा उल्लेख नसल्याचे चौकशी समितीला आढळून आले. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी 11 जून 2004 च्या शासन निर्णयानुसार शाळेवर कारवाई करून नाव काळ्या यादीत समाविष्ट केले, अशी माहिती देशमुख यांनी दिली. तसेच महापालिकेने शैक्षणिक संस्था म्हणून विविध करांत दिल्या जाणाऱ्या सवलती बंद करण्याचे पत्रही दिले.

2020 मधील तक्रार आहे.

2020 मधील केलेल्या तक्रारी संदर्भातील ही कारवाई आहे. मी दहा महिन्यांपूर्वी रुजू झाले आहे. या प्रकरणात मला काहीही माहिती नाही. पालकांना कोणतीही सक्ती करण्यात येत नाही.-शिखा श्रीवास्तव, उपप्राचार्य, द जैन इंटरनॅशनल स्कूल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!