औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आजपासून निर्बंधांना टा टा – बाय बाय..

📃 औरंगाबाद जिल्हयासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंटचा संसर्गच्या पार्श्वभूमीवर अनुरुप वर्तनाची रेस्टॉरंट, हॉटेल्स, बाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी.

💁🏻‍♂️ कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वरील नमूद केलेल्या संदर्भ क्र. 04 द्वारे निर्बंध हॉटेल, रेस्टॉरेंट, तत्सम आस्थापनांसाठी औरंगाबाद जिल्हा क्षेत्रात लागू करण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद जिल्हातील कोविड- 19 विषाणू प्राभावाची सद्यस्थिती लक्षात घेवून दि. 09.01.2022 च्या आदेशातील वाव क्रमांक 13 मधील आस्थापना चालु ठेवण्याच्या वेळेत सुधारणा करुन व च्या शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्याच्या अधीन राहुन सदर आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व आयुक्त महानगरपालीका औरंगाबाद शहर यांच्या स्वाक्षरीने औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता दि . 08/02/2022 पासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत .

रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी / नाष्टा केंद्र बाबत

▪️निर्बंधांबाबत सुचना सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मूभा असेल तथापी सदर भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या बाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पध्दतीने लावण्यात यावे.

▪️दोन्ही लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अस्थापना व्यवस्थापक व मालकाची असेल.

▪️नमुद आस्थापना दररोज सकाळी 8 ते रात्रौ 11 वाजे पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील . घरपोच सेवा ( Home Delivery ) दररोज सुरु ठेवता येईल.

वेळ वाढविण्यात आल्या मुळे गर्दी कमीच राहील तसेच अकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी जरी असली तरी त्यानंतर फक्त अर्धा तास कर्मचारी सोडणे, साफसफाईच्या कामासाठी शिथिल म्हणून ग्राह्य धरला जाईल . त्यानंतर नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाई केली जाईल असे आदेशामध्ये नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!