जुन्या वादातून कुऱ्हाडीने केला खून; औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील घटना..

संतोष भानुदास गल्हाटे वय 27 वर्षे, या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पैठण येथील बालानगरिमध्ये घडली असून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी दिनेश गल्हाटे

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यात असलेले बालानगर येथील दारूच्या दुकानाच्या समोर असलेल्या मैदानावर बुधवारच्या रात्री संतोष गल्हाटे आणि त्याच्या भाऊबंध असलेला दिनेश भाऊसाहेब गल्हाटे यांच्यातील जुना वाद पुन्हा उफळून आला या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दिनेश गल्हाटेने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने संतोषच्या डोक्यात, हातावर घाव घालून त्याला जागीच ठार केले.

संतोष ठार झाल्याचे लक्षात येताच दिनेश हा पैठण पोलीस ठाण्यात जाऊन मी संतोषला खल्लास केले आहे असे सांगितले. त्याने असे सांगताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याला अधिकची विचारपूस केली असता त्याने जुन्या वादाच्या रागातून संतोषची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांना घटनेची माहिती दिली.

यानंतर संतोष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास एमआयडीसी पैठण पोलीस करत आहेत.

Similar Posts