दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत बंपर भरती, 2422 पदांकरिता त्वरित अर्ज करा…

मध्य रेल्वेने शिकाऊ पदासाठी 2422 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com द्वारे १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
या शिवाय उमेदवार https://rrccr.com/Home/Home या लिंकवर क्लिक करून भारतीय रेल्वे भर्ती 2022 साठी थेट अर्ज करू शकतात. तसेच https://rrccr.com/PDF-Files/Act_Appr_21-22/Act_Appr_2021-22.pdf या लिंकवर अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात.

फिटर, वेल्डर, टर्नर, सुतार, पेंटर, टेलर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, प्रोग्रामिंग आणि सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंटसह अनेक व्यवसायांसाठी या नियुक्त्या केल्या जातील. सर्व पदांसाठी शिकाऊ उमेदवारी एक वर्षाची असेल.

ही भरती इयत्ता 10वी आणि ITI अभ्यासक्रमात मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासह, NCVT किंवा SCVT द्वारे जारी केलेल्या पोस्टशी संबंधित व्यापारातील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.

वय मर्यादा

उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे. मुंबई, क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथे असलेल्या विविध युनिट्ससाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाईल.

सर्वप्रथम तुम्हाला मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटिसेसवर क्लिक करावे लागेल. नंतर खाली दिल्याप्रमाणे काही मूलभूत माहिती प्रविष्ट करावी लागेल. आता जी कागदपत्रे मागवली आहेत ती अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर फी जमा करून जमा करावी. नंतर तुमच्या अर्जाची प्रिंट आउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)
पद संख्या – 2422 जागा
मुंबई : १६५९ जागा
भुसावळ : ४१८ जागा
पुणे : १५२ जागा
नागपूर : ११४ जागा
सोलापूर : ७९ जागा
शैक्षणिक पात्रता – 10th Pass
नोकरी ठिकाण – भुसावळ, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर विभाग
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज शुल्क

• सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये.

• SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!