दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या शंभराच्या आत…

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 07 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 338 जण कोरोनामुक्त, 5 मृत्यू तर 3 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 338 जणांना (मनपा 190, ग्रामीण 148) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 61 हजार 336 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 559 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 714 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (72)

पुडंलिक नगर 1, नरहरी नगर 1, जय भवाणी नगर 3, उस्मानपुरा 1, प्रताप नगर 1, उल्कानगरी 1, संत तुकोबा नगर 1, पैठण गेट 1, भगतसिंग नगर 1, मयुर पार्क 1, होनाजी नगर 1, अन्य 59

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (12)

औरंगाबाद 4, गंगापूर 3, सिल्लोड 2, वैजापूर 3,

मृत्यू (05)

घाटी (02)

1. 72 पुरुष, ता.कन्नड, औरंगबाद
2. 41 पुरुष, दहेगाव ता.गंगापुर, औरंगाबाद

खासगी (03)

1. 73 पुरुष, एस.बी.कॉलनी , औरंगाबाद
2. 89 पुरुष, दशमेश नगर, औरंगाबाद
3. 86 पुरुष, इटखेडा, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!