धक्कादायक घटना: वर्ध्याच्या खासगी रुग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये मिळाले 11 कवट्या आणि 54 गर्भाचे अवयव, भ्रूणहत्येचा संशय..

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कदम नावाच्या खासगी रूग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये 11 गर्भाच्या कवट्या आणि अन्य 56 मानवी अवयव सापडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांच्यासह काही जणांना अटक करून तपास सुरू केला आहे.

वर्ध्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले की, या रुग्णालयाच्या करस्थानाची माहिती मिळाली, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून तपास करून पुरावे गोळा केले जात आहेत.

पोलिस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार आर्वीच्या कदम हॉस्पिटलबाबत तक्रार आली होती की, या रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याने बलात्कार पीडितेची प्रकृती खालावली आहे.

पीडित मुलीच्या आईने आर्वी पोलिसात तक्रार दिली की, तिची मुलगी 13 वर्षांची असून, एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर बलात्कार केला त्यातून तिची मुलगी गर्भवती राहिल्याने कदम हॉस्पिटलमध्ये मुलीचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला, त्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडली. या तक्रारीच्या आधारे अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी रेखा कदम नावाच्या डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या नर्सला अटक केली होती.

आर्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर रेखा कदम आणि नर्सला 9 जानेवारीला अटक केली होती. या प्रकरणी मुलीवर बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

मुलीचा गर्भपात न केल्यास मुलीची बदनामी करू, अशी धमकी मुलाच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिली होती. गेल्या आठवड्यात त्यांनी गर्भपातासाठी पैसेही दिले. याप्रकरणी बेकायदेशीर गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोक्सोसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्वी पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान रुग्णालयातील गोबर गॅस टाकीमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी टाकी उघडली असता, त्यातून 11 गर्भाच्या कवट्या आणि इतर 56 अवयव सापडले. तालुका वैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे डॉ. रेखा कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना आणि अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!