भारतरत्न स्वर कोकिळा यांनी आज जगाचा निरोप घेतला. महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांसह देशभरातील सर्वसामान्य आणि विशेष लोक हळहळले आहेत.
मनोरंजन विश्वातील लोकही ओल्या डोळ्यांनी त्यांचे स्मरण करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अक्षय कुमारपासून ते सलमान खानपर्यंत, कतरिना कैफपासून आलिया भट्टपर्यंत सर्वांनीच ट्वीट करून लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली.
पण याच दरम्यान मलायका अरोराने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिला आता चांगलेच ट्रोल केले जात आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मलायकाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने केशरी रंगाचा बिकिनी टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान केले आहे. डोळ्यांवर काळा चष्मा घालून तलावात बसलेल्या मलायकाचा हा फोटो पाहिल्यानंतर आता सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CZn_QTVqAYm/?utm_medium=copy_link
मलायकाने फोटोसोबत कॅप्शन दिले आहे, ‘Sunday sunny side up..’, हे पाहून मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने कमेंट करत ‘बेस्ट कॅप्शन’ असे लिहिले आहे.
पण मलायकाच्या या पोस्टमुळे आता सोशल मीडिया यूजर्स नाराज झाले आहेत. त्यांचा राग काढत लोकांनी ‘काहीतरी लाज बाळग’ अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसर्याने लिहिले, ‘थोडी तरी शरम ठेव.. बॉलीवूड ही तुमची ओळख आहे आणि लताजींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी तुला हे वाईट फोटो पोस्ट करताना लाज वाटली पाहिजे’. दुसऱ्याने लिहिले, ‘कमीत कमी आज तरी असा फोटो पोस्ट करू नको’. तसंच अनेकांनी कमेंट करताना मलायका अरोरावर आपला राग व्यक्त केला आहे.