आजपासून औरंगाबाद खंडपीठात ऑनलाइन सुनावणीस प्रारंभ..

मागील काही दिवसांपासून प्रत्यक्ष सुनावणीसाठी वकिलांसह न्यायमूर्ती आग्रही होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठातील काही न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.
त्यामुळे कोरोनाचा धोका नको आणि कामकाजही प्रभावित व्हायला नको, यासाठी औरंगाबाद खंडपीठात आज पासून ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील दोन आठवडे होणार ऑनलाइन सुनावणी.

औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज आजपासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन सुनावणी पद्धतीने होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी आणि सचिव ॲड. सुहास उरगुंडे यांनी दिली.

खंडपीठातील काही न्यायाधिश, वकिलांना कोरोनाची लक्षणे जाणवली व न्यायालयातील गर्दी पाहता ऑनलाइन कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!