औरंगाबाद जिल्ह्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट..

औरंगाबाद जिल्ह्यात धावत्या कारने अचानक पेट घेतला. मात्र नशीब जोरावर होते म्हणून सहा जणांचा जीव वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज रविवार दिनांक 27 रोजी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील बसस्थानकाजवळ रस्त्यावरुन जाणाऱ्या कार क्रमांक MH-20 DJ 2107 ने अचानक पेट घेतली. सुदैवाने कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे कार मधील सहाही जणांचा जीव वाचला आहे.

कारने का पेट घेतली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!