गुजरातमध्ये माथेफिरू प्रियकराने कुटुंबासमोरच मुलीचा गळा चिरला, व्हिडिओ व्हायरल…
गुजरातच्या सुरतमधून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. जिथे प्रेमात फेनिल पंकज गोयानी नावाचा 20 वर्षांचा मुलगा इतका वेडा झाला आहे की त्याने रस्त्याच्या मधोमध ग्रीष्मा नावाच्या मुलीची हत्या केली. आश्चर्य म्हणजे आरोपीने मुलीची आई आणि भावासमोरच तिचा गळा चिरला. एवढेच नाही तर कुटुंबातील मुलीला वाचवण्यासाठी जो कोणी आला, त्याच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या निर्घृण हत्येने संपूर्ण गुजरात हादरला आहे.
भेटण्यास नकार दिला म्हणून केली हत्या
खरं तर, हे संपूर्ण प्रकरण सुरत जिल्ह्यातील पासोदरा गावातील आहे, जिथे आरोपी 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता मुलीच्या घरी पोहोचला व तिला बाहेर ओढले, मुलीने त्याला खूप विरोध केला मात्र त्याने मुलीला पकडून तिचा गळा चिरला. आरोपी फेनिल हा गेल्या वर्षभरापासून ग्रीष्माचा छळ करत होता आणि केवळ अनाठायी प्रेमातून त्याने ही घटना केल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन दिवसांनी मंगळवारी मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अखेरच्या प्रवासात हजारो लोकांनी हजेरी लावत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली.
मुलीची हत्या केल्यानंतर फेनिलने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला कुठेतरी जाऊन त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. तो सापडल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेथून कामरेज पोलिसांनी त्याला अटक केली.
मुलीच्या हत्येनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. लोक मृतदेहाजवळ आले. त्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यादरम्यान शहरभर चर्चा सुरू होती. आता लोक मारेकऱ्याला फाशी द्यावी अशी मागणी करत आहेत.