धक्कादायक! नवजात बालकाचे ल.च.के. तोडून कुत्र्यानं डोकं केलं ध.डा. वेगळं अन्….
वनस्थलीपुरम (हैदराबाद) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. सहारा गेटजवळ एक कुत्रा अ.र्भ.का.चे डोके तोंडात घेऊन फिरताना दिसला. कुत्र्याच्या तोंडात अर्भकाचे डोके पाहून स्थानिक नागरिक आवक् झाले. सदरील घटना पाहिल्यानंतर घटनास्थळाजवळ दूध केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीने वनस्थलीपुरम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती व तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व श्वान पथकासह तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत की, अखेर रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला नवजात अ.र्भ.का.चे डोके कोठून मिळाले? त्या नवजात बालकाला अशा प्रकारे कोणी, कुठे आणि का सोडले, मृत्यूनंतर नवजात अ.र्भ.का.चे अशाप्रकारे सोडण्यात आले होते की जिवंतपनीच सोडण्यात आले होते, याचाही तपास पोलीस करत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत असून सखोल तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मनचना कार्तिक यांचा मुलगा मनचना महेंद्र (वय 27) याची तक्रार आली की 13 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार हे सहारा रोड येथील विवेकानंदांच्या मूर्तीजवळ असलेल्या त्यांच्या मित्राच्या दुधाच्या दुकानात बसले होते, तेव्हा त्यांना एक भटका कुत्रा त्याच्या तोंडात नवजात अ.र्भ.का.चे डोके घेऊन जाताना दिसला. हे पाहून महेंद्र कुत्र्याजवळ गेला आणि कुत्र्याला हाकलून लावले, त्यामुळे कुत्रा बालकाचे डोके तेथेच सोडून पळून गेला. त्यानंतर महेंद्र याने डायल 100 वर कॉल केला.
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तक्रारदाराने आवश्यक कार्यवाहीची विनंती केली. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढे बोलतांना पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी बाळाचं डोकं ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलंय. तसेच अज्ञात व्यक्ती विरूध्द कलम 318 (देहाची गुप्त विल्हेवाट लावणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.