mhada lottery घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे मंडळाकडून येत्या आठवड्यात तब्बल 5990 घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.‌ ही लॉटरी पुणे मध्ये निघालेली आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील लाभार्थी यासाठी अर्ज करु शकतो.

म्हाडा मार्फत घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून देखील लाभ दिला जातो. mhada lottery pune 2023 in marathi महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागातर्फे पुण्यामध्ये सध्या 5990 घरांची लॉटरीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहे, तसेच अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड) – मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.
2) प्रतिज्ञापत्र
3) पत्त्याचा पुरावा (अर्जदाराच्या आधार कार्डवरील पत्ता सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर अर्जदाराने सध्याचा पत्ता देणं आवश्यक आहे)
4) महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र (तहसीलदाराने दिलेले प्रमाणपत्र)
5) उत्पनाचा दाखला (तहसीलदाराने जारी केलेले आयकर विवरण किंवा उत्पन्नाचा पुरावा किंवा जोडीदाराचा उत्पन्नाचा पुरावा नोकरीत असल्यास जोडीदाराचे आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने जारी केलेले उत्पन्नाचा पुरावा)
6) स्वयंघोषणा पत्र

याअगोदर म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी 21 कागदपत्रांची आवश्यकता होते. मात्र, आता फक्त 6 ते 7 कागदपत्रांची आवश्यकता आहे.

mhada lottery असा करा अर्ज
म्हाडातर्फे घर मिळविण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला https://lottery.mhada.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तुमच्या अर्जाची पडताळणी करुन तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.


हे देखील वाचा –