Aadhar Link to Pan Card | शेवटची संधी! नाहीतर बसेल 10 हजार रुपयांचा दंड, पॅन कार्ड आधार कार्डला असं लिंक करा

Aadhar Link to Pan Card
Aadhar Link to Pan Card

Aadhar Link to Pan Card: भारतीय नागरिकांचा ओळखीचा पुरावा आधार कार्ड आणि पॅन कार्ड असतो. कोणताही व्यवहार असो, पॅन कार्ड जवळ असणे आवश्यक असते. आधार कार्ड लहान मुलांना देखील काढता येते. मात्र, पॅन कार्ड काढण्यासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणं आवश्यक आहे.

केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्डबाबत निर्णय घेतलेला आहे. सरकारने पॅन कार्ड हे आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊन देखील अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलेले नाही. Aadhar Card Link to Pan Card

केंद्र सरकारच्या नियमामुळे आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करावे लागते. यामुळे ऑनलाईन व्यवहारांच्या प्रक्रियेत सुसुत्रता येते. तसेच ग्राहकांकडे पॅनकार्ड नसतं, त्यावेळी केवळ आधार कार्डच्या साहाय्यानेही व्यवहार करता येतो.

पॅन कार्ड व आधार लिंकिंगसाठी अनेक दिवसांपासून मुदत देणे चालू आहे. परंतु, अनेक नागरिकांनी लिंक केले नाही. मागे सरकारने दिलेल्या आदेशानुसार 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड भरुन आधार व पॅन कार्ड लिंक करता येत होते. मात्र, आता यामध्ये बदल केला गेला आहे.

आता आयकर विभागाने 30 जूननंतर दंडाची रक्कम 1,000 रुपये केली असून, 31 मार्च 2023 पर्यंत हे काम करावे लागणार आहे. 31 मार्च 2023 नंतर आधारशी लिंक नसलेले पॅन कार्ड आपोआप रद्द होणार आहेत. असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. Aadhar Link to Pan

पॅन कार्ड व आधार लिंकिंग करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. लिंकिंग प्रोसेस तुम्हाला गुगल क्रोम ब्राऊझर मध्ये करता येते. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही व पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करायचे जाणून घेऊ या..

आधार व पॅन कार्ड लिंक आहे का नाही असं चेक करा
मोबाईलवर UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number> ही माहिती देऊन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आधार व पॅन कार्ड लिंक झाले की नाही. हे समजणार आहे (how to link aadhar to pan online)

पॅन कार्ड व आधार कार्ड असे लिंक करा
सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेबसाईटवर जा.
तुम्ही जर या वेबसाइट पहिल्यांदा आला असेल तर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
आता आधार लिंक पर्यायावर क्लिक करा.
आता लॉगिन करा आणि अकाऊंट प्रोफाईल मध्ये जा.
यानंतर, आधार लिंकवर पॅन कार्ड आणि आधार क्रमांक टाका.
तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!