How to Apply Aadhar Card Online in Marathi | आता घरबसल्या फक्त 50 रुपयांत आधार कार्ड काढा, ही सोपी पद्धत वापरा

Apply Aadhar Card Online
Apply Aadhar Card Online

Apply Aadhar Card Online: आधार कार्ड सर्व भारतीयांचा आधार आहे. या आधार कार्डाने देशातील नागरिक अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. सरकारी योजनांचा लाभ इतर अनेक कामे आहे, जे की आधार कार्डशिवाय होत नाही. आधाराशिवाय पानं हलत नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही.

देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांसाठी सरकारने आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. (UIDI) बँकिंग असो, सरकारी कामं असाे वा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असला, तरी आधार कार्ड शिवाय पर्याय नाही. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड मागितले जाते.

पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस सिलिंडर, बॅंके खात्यासोबत आधार कार्ड लिंक केलेलं असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. how to download aadhar card यावरूनच या आधार कार्डचे महत्व लक्षात येते. यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे.

तुमच्यासाठी खास आधार कार्ड आहे. जिचं नाव PVC Aadhar Card असं आहे. हे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन 50 रुपयांत काढू शकता. ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवर करू शकता. हे आधार कार्ड एकदम सुरक्षित असून हे खराब देखील होत नाही.

pvc aadhar apply online in marathi चला तर पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे जाणून घेऊ या..

असे काढा ऑनलाईन PVC Aadhar Card
सर्वप्रथम UIDI च्या https://uidi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
माय आधार टॅब अंतर्गत आधार पीव्हीसी ऑर्डर पर्यायावर क्लिक करा.
आपले आधार कार्ड नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी नंबर किंवा ईआयडी नंबर टाका. सुरक्षा कोडची नोंद करा.
आपल्या मोबाईलवर ओटीपी मिळवण्यासाठी ‘Send OTP’ बटणावर क्लिक करून मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.
नियम आणि अटीच्या ऑप्शन निवडा आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
आपले आधार कार्डचा प्रीव्ह्यू तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
आता 50 रुपयांचे पेमेंट करण्याचे ऑप्शन दिसेल. येथे 50 रुपयांचे पेमेंट करुन टाका.
जर तुमचा मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्डचा प्रीव्ह्यू उपलब्ध होणार नाही.
हे पीव्हीसी आधार कार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे मिळून जाईल.

Aadhar Card Download in Marathi अशा पद्धतीने तुम्ही PVC Aadhar Card काढू शकता. हे आधार कार्ड एकदम कडक असल्याने खराब होत नाही. एकदम सुरक्षित असं हे आधार कार्ड आहे. ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना देखील नक्की शेअर करा.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!