मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पोलीसाचे केस ओढून मारली लाथ! व्हिडीओ वायरल !!

मुंबई : जास्त नशा केल्याने माणूसाचे संतुलन बिघडते. अशा लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळत असतात. आता महाराष्ट्रातील सानपाडा येथील असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

मद्यधुंद तरुणी पोलिसांसह टॅक्सी ड्रायव्हर आणि रस्त्यावरील इतर लोकांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहे. तरुणीचे हे गैरवर्तन पाहून संतापलेल्या टॅक्सी चालकाने आणि वाटसरूंनी तिचा व्हिडीओ बनवला. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसोबत सुद्धा ती गैरवर्तन करत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या मुलीसोबत इतरही मुली असून सर्व मुली फुल्ल टू होत्या.

सदरील तरुणीने ola cab च्या चालकाला मारहाण केल्याचे वृत्त असून ती तरुणी अत्यंत गल्लीच्छ भाषेमध्ये पोलीस अधिकारी, येणारे – जाणारे वाटसरू यांना शिवीगाळ सुध्दा करत होती..

खाली स्क्रोल करून पाहा बाकीचे व्हिडिओ..

दारूच्या नशेत टल्ली असणाऱ्या तरुणीने पोलिसांशी गैरवर्तन केले

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी दारूच्या नशेत पोलीस अधिकारी समोर असताना, कधी ती पोलिसाची कॉलर पकडत होती, तर कधी पोलीस अधिकाऱ्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत होती. तरुणीच्या या संतापजनक कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी मुलीवर सडकून टीका करत आहेत.

पोलीस कर्मचारी सर्व सहन करत राहिले

पोलिस कर्मचारी त्या मुलीचे सर्व गैरवर्तन मूकपणे सहन करत होते. त्यांनी मुलीला धक्का सुद्धा लावला नाही. कदाचित त्यांना हे देखील माहित असेल की जर त्यांनी काही केले तर ही मुलगी उलट त्यांच्यावरच खटला भरेल. ही तरुणी पोलिसाशी का भांडत आहे, हेही समजू शकलेले नाही. मात्र, तरुणी नशेत असे वागत होती. या व्हिडीओमध्ये आपण पोलिसांची गाडीही पाहू शकतो.

तरुणीच्या सततच्या गैरवर्तनानंतर देखील पोलीस अधिकारी शांत राहून तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच व्हिडीओमध्ये पुढे ती मुलगी पोलीस कर्मचाऱ्याचा मास्क हिसकावताना सुध्दा दिसत आहे. शिवाय रस्त्याच्या मधोमध, मुलगी पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर धरून त्यांना धमकावताना दिसत आहे. त्यानंतर तरुणीने या कर्मचाऱ्याचे केस ओढून त्यांना लाथ मारण्याचाही प्रयत्न केला. हा व्हिडिओ पाहून या तरुणीविरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

हा व्हिडिओ पाहून लोक तरुणीवर टीका करत आहेत. यासोबतच अमित शहा आणि गृह मंत्रालयाला टॅग करत पोलिसांना अधिक अधिकार देण्याची विनंती केली आहे.

पाहा व्हिडिओ..

मद्यधुंद तरुणीचे पोलिसांसोबत गैरवर्तन..
त्या तरुणी सोबत तिच्या मैत्रिणी सुध्दा फुल्ल टू होत्या..
त्या तरुणीने व्हिडिओ बनवणाऱ्या मुलाला देखील शिवीगाळ करत हाथ मारली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!