पैश्याच्या वादातून वृद्ध बापाने भरदिवसा मुलाला जिवंत पेटवले..

बेंगळुरूमधील एका व्यावसायिकाला आपल्या मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये पैशाच्या सेटलमेंटवरून वादावादी झाली. या व्यावसायिकाच्या मुलाचा नंतर आगीत मृत्यू झाला.

कलियुगमध्ये पुत्राने वडिलांचा छळ केला किंवा मारहाण केली असे अनेकदा ऐकायला मिळते. पण या कलियुगात बापाने आपल्या मुलावर थिनर टाकून जाळून मारल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली.

मुलाने वडिलांना तसे न करण्याबाबत खूप विनवणी केली, पण वडिलांच्या मनाला पाझर फुटला नाही आणि तो मुलाला जळताना पाहत राहिला. ही घटना बंगळुरूच्या बाल्मिकी नगरमधील असून 1 एप्रिलला घडली आहे, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरोपी पिता व मयत अर्पित

मुलाने वडिलांची विनवणी केली, तरीही बापाच्या हृदयाला पाझर फुटला नाही

फुटेजमध्ये पीडित अर्पित एका इमारतीतून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. अर्पित ओला दिसतोय. त्याचा मृतदेह थिनरने भिजला होता असे पोलिसांनी सांगितले. थिनर ने भिजलेला अर्पित घरातून बाहेर आल्यावर त्याचे वडील त्याच्या मागे धावत आले. अचानक वडिलांनी एक माचिस पेटवून अर्पितच्या अंगावर फेकली.

पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही पण त्याने हार मानली नाही आणि दुसऱ्या प्रयत्नात माचिसची काडी त्याच्या अंगावर ठिणगीसारखी भडकली. अचानक या आगीने भीषण रूप धारण केले. शेजाऱ्यांनी आग विझवून अर्पितला रुग्णालयात नेले. पण काल गुरुवारी अर्पितचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत वडील सुरेंद्रला अटक केली आहे.

Similar Posts