Har Ghar Tiranga 2.0: “हर घर तिरंगा” मोहिमेकरिता टपाल खात्यात फक्त २५ रुपयांत मिळेल राष्ट्रध्वज…!

Har Ghar Tiranga Abhiyan 2.0: गतवर्षीप्रमाणेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. भारतीय टपाल खाते “हर घर तिरंगा अभियान” मधील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने देशभरातील १.६ लाख पोस्ट ऑफिसमधून तिरंगा ध्वजांची विक्री करत आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिक टपाल विभागाच्या ई-पोस्ट ऑफिसमधून ध्वज ऑनलाइन खरेदी करू शकतात. नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमान जागृत करणे हाच या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे

Har Ghar Tiranga 2.0: आज दिनांक ५ ऑगस्ट २०२३ पासून स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने “हर घर तिरंगा” (Har Ghar Tiranga abhiyan) मोहीम २.० सुरू केली आहे. देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. जनतेच्या सुविधेसाठी राज्यातील सर्व टपाल कार्यालयांत मात्र २५ रुपयांत राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शिवाय, सर्व प्रकारच्या सरकारी व खासगी संस्था, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांना भारताचे राष्ट्रध्वज पाहिजे असल्यास त्यांनी १० ऑगस्टपासून टपाल खात्याशी संपर्क करावा. राष्ट्रध्वजांच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डरसाठी कृपया पणजी मुख्यालय व मडगाव मुख्यालयाशी अथवा विपणन कार्यकारी राजेश मडकईकर (संपर्क ९८९०७०१६०१) यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन भारतीय टपाल खात्याने केले आहे.

All India Redio न्यूजच्या अधिकृत ट्विट हॅण्डलनुसार, हर घर तिरंगा मोहीम २.० साजरा करण्यासाठी भारतीय पोस्ट ऑफिस १.६० लाख पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वजची विक्री करणार आहे. भारत सरकार १३ ते १५ ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवत आहे. विभागाच्या ई-पोस्ट ऑफिस सुविधेद्वारेही भारतीय जनता राष्ट्रध्वज खरेदी करू शकतात

भारताच्या राष्ट्रध्वजाची किंमत किती ?

तुम्ही राष्ट्रीय ध्वज जवळच्या पोस्ट ऑफिसमधून किंवा ऑनलाइन २५ रुपयांच्या नाममात्र किमतीत खरेदी करू शकता. PIB च्या २ ऑगस्ट २०२३ च्या प्रेस रिलीझनुसार, या मोहिमेमध्ये पोस्ट विभाग ही विक्री आणि वितरण एजन्सी आहे, जी लोकांना जवळजवळ वाजवी दरात राष्ट्रीय ध्वज उपलब्ध करून देते. ज्याची किंमत २५ रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!