राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!
भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडून महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे..
दिनांक 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला असून भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचलं आहे. तर पुढचे तीन दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या 5 दिवसांमध्ये काही भागात उष्णतेची लाट जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला असून राज्यातील औरंगाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर, परभणी सह अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट जाणवेल, हा अंदाज वर्तवण्यात आला असून दुपारी कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणवणार उष्णतेची लाट
28 मार्च : बुलडाणा, अकोला,
29 मार्च : बुलडाणा, अकोला, आणि अमरावती
30 मार्च : औरंगाबाद, जालना, अहमदनगर, जळगाव, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, यवतमाळ आणि अमरावती
31 मार्च : औरंगाबाद, जळगाव, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर
1 एप्रिल : औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, जालना , परभणी, हिंगोली
जळगावमध्ये उद्यापासून तीन दिवस उष्णतेचे
जळगाव जिल्ह्यमध्ये 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्मा.घातापासून बचाव व उपाय योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन व आरोग्य विभागास सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.