गोर सेनेचा क्रांतीकारी विराट मोर्चा मुंबईत धडकणार…

“ओबीसी के सन्मान मे, गोरसेना मैदान मे….!”



भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पुर्ण झाली,तरीही या देशाचे मुलनिवासी म्हणुन गोर-बंजारा समाजासहीत ओबीसी प्रवर्गातील गोर गरिब,दिन दुबळ्या,सामान्य जनतेला न्याय-हक्क,मान-सन्मान,अधिकार, लोकसंख्येच्या दृष्टीने अजुनही मिळालेला नाही. सारख्याच असंख्य मागणीसाठी 11मे 2022 रोजी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रा. संपतभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येने क्रांतीकारी विराट मोर्चा धडकणार आहे.

या मोर्चाला संभाजीनगर जिल्हातील तमाम ओबीसी बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रविंद्र जाधव (संभाजी नगर शहर अध्यक्ष) यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम राजकीय, सामाजिक संघटन संस्था व नेते तसेच कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन केले आहे.

या विशाल मोर्चाला जवळपास 4-5 लाख ओबीसी बांधव उपस्थित असु शकतात असा अंदाजही शहर अध्यक्ष रविंद्र जाधव यांनी वर्तविला आहे.

मागील कित्येक वर्षांपासून शोषित-पिडीत, दिन-दलित, कष्टकरी, उसतोडी करणारे, सर्व सामान्य ओबीसी बांधवांना न्याय मिळालेला नाही. वारंवार सर्वसामान्यावर अन्याय होतांना ठीक ठिकाणी निदर्शनास येत आहे.
त्याशिवाय जात निहाय जनगणना करणे, स्थानिक स्वराज्य संस्था तील निवडणुकीतील आरक्षण अबाधित राहणे, नाॅन-क्रिमीलेयर अट रद्द करणे,सारथी-बार्टी च्या आधारावर ओबीसी व VJNT विद्यार्थीना सवलती देणे, जात वैधता प्रमाणपञ देण्याचे अधिकार जिल्हापातळीवरुन विभागीय पातळीवर करणे, विमुक्त जाती भटक्या जमातीना एकाच प्रवर्गात दाखल करणे, ओबीसी विद्यार्थीसाठी वसतीगृहाबरोबरच स्वतंञ शैक्षणिक सुविधा पुरविणे,

अशा विविध मागण्या घेऊन गोरसेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रा संपतभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेशभाऊ चव्हाण यांच्या आदेशानुसार क्रांतीकारी विराट मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे धडकणार असल्याने महाराष्ट्रातील तमाम आजी-माजी खासदार-आमदार,जिल्हा परिषद-पंचायत समिती अध्यक्ष, सभापती,सदस्य विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आदींनी येत्या 11 मे 2022 रोजी मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन रविंद्र जाधव गोरसेना संभाजी नगर शहर अध्यक्ष यांनी केले आहे.

या मोर्चा मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हातील ओबीसी बांधव भगिनी सह परराज्यातील सुद्धा पदाधिकारी हजर राहणार आहेत.

रविंद्र जाधव (संभाजी नगर शहर अध्यक्ष)

Similar Posts