Online Land Survey 2024 | तुमच्या जमीनीची मोजणी आता ऑनलाइन! शेतकऱ्यांनो घरबसल्या Free अर्ज करण्याची जाणून घ्या सोपी प्रक्रिया
Online Land Survey | आपल्याला जमिनीच्या मोजणीसाठी त्यासंबंधित ऑफिसमध्ये खेट्या माराव्या लागतात. जमिनी संबंधितचे सर्व कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात जाऊन तासन् तास वाट पाहणे, काम न झाल्यास परत येणे या सगळ्या गोष्टींमुळे आपला वेळ आणि पैसा वाया जातो.
पण आता या सगळ्या गोष्टींना कायमचे बाय बाय करण्याची वेळ आली आहे. कारण, की तुम्ही आता तुमच्या जमिनीची मोजणी तुमच्या मोबाईलवर घरबसल्या ऑनलाइन (Online Land Survey) पद्धतीने करू शकता.
काय असते जमिनीची मोजणी?
जसे की तुम्हाला माहितीच आहे की, जमिनीच्या सिमेबाबत वाद हे निर्माण होतच असतात, कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की हे प्रकरण पोलीस स्टेशन आणि न्यायालयात जातात. अश्या वादांना आळा बसावा यासाठी त्या जमिनीची मोजणी करणे अत्यंत आवश्यक असते. आता हीच मोजणी तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने (manner) करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईल किंवा संगणकावर बसूनच ही मोजणीसाठी अर्ज करू शकतो.
का करावा Land Survey?
- जमिनीच्या हद्दीबाबत वाद असल्यास
- जमीनीची खरेदी किंवा विक्री करतांना
- बँकेकडून जमिनीवर कर्ज घेताना
- जमीन खरेदी-विक्री करार (Agreement) करताना
- इतर काही कायदेशीर कामांसाठी
Online Land Survey चे प्रकार खालीलप्रमाणे :
- साधी मोजणी: ही मोजणी सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होते.
- तातडीची मोजणी: ही मोजणी तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होते.
- अति तातडीची मोजणी: ही मोजणी दोन महिन्यांच्या आत पूर्ण होते.
Online Land Record Survey साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
- सरकारी वेबसाइटला भेट द्या: तुमच्या जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- लॉगिन करा: त्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- अभिलेख सेवा निवडा: त्यानंतर अभिलेख सेवाच्या पर्यायावर क्लिक करा.
- जमीन मोजणी निवडा: त्यानंतर जमीन मोजणीच्या पर्यायावर क्लिक करा.
- विचारलेली माहिती भरा: त्यानंतर तुमची सर्व माहिती जसे की तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, गाव इ. ची बिनचूक भरा.
- फी भरा: त्यानंतर ऑनलाइन फी भरा.
- अर्ज सबमिट करा: त्यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री (sure) करून ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
Online पद्धतीने Land Survey चे फायदे:
- वेळेची बचत : तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
- घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा: Online Land Survey साठी तुम्ही घरबसल्याच मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.
- पारदर्शकता: ऑनलाइन Online Land Survey ची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने शंभर पारदर्शकता राहते.
Online Land Survey करतेवेळी ही काळजी घ्या:
- अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- जर तुम्हाला काही अडचण आली तर संबंधित विभागाशी संपर्क साधा.
- अशा प्रकारे, आपण घरबसल्याच जमिनीची मोजणीसाठी (for counting) अर्ज करून आपला वेळ वाचवू शकतो.