‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी आणलेल्या 1 कोटी 17 लाख रुपयांवर कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला..!
औरंगाबाद शहरामधील राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांच्या 29 एटीएममध्ये एटीएममध्ये पैसे न भरता 1 कोटी 16 लाख 80 हजार 200 रुपयांचा भरणा केल्याचा बहाणा करून पैसे भरलेल्या नोंदीही केल्या गेल्या. मात्र कंपनीच्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीने आठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…