औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप..
औरंगाबाद जिल्ह्यातील बहुचर्चित 30-30 घोटाळ्याच्या सूत्रधाराला शुक्रवारी पोलिसांनी अखेर अटक केली. कन्नड येथील त्याच्या घराला घेराव घालत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना 30 टक्के व्याजासह पैसे परत देण्याच्या नावाखाली याने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड याला कन्नड येथील घरातून अटक केली. असा…