औरंगाबादेत रामनवमी मिरवणुकीत मशिदीला मानाचा मुजरा. मशिदी जवळ DJ बंद करून दाखविला हिंदू-मुस्लिम भाईचारा..
देशात हलाल मटण, मासांहार VS शाकाहार असा वाद सुरु असताना मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये एक सुखद घटना घडली आहे. निमित्त होते राम नवमी या उत्सवाचे. रामनवमी निमित्त युवा सेनेतर्फे काढण्यात आलेली मिरवणूक उस्मानपुरा येथील तारा पान सेंटर जवळील बडी मशिदीजवळ आली असता DJ आणि घोषणा बंद करण्यात आल्या. मशिदीच्या थोड्या पुढे गेल्यावर पुन्हा DJ सुरू करण्यात…
