औरंगाबाद बनले ‘कंडोम हब’, एका महिन्यात 36 देशांमध्ये 100 दशलक्ष कंडोमची निर्यात..
36 देशांचे कुटुंब नियोजन करणारं औरंगाबाद शहर.. महाराष्ट्रातील औरंगाबादने औद्योगिक क्षेत्रात ‘ऑटो हब’ (Auto hub) म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. बजाज, (Bajaj) स्कोडा (Skoda) आणि एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीजसारख्या (Endurance Technologies) बड्या कंपन्यांसह औरंगाबादमध्ये लहान-मोठ्या एकूण चार हजार कंपन्या आहेत. त्यामुळे शहराने वाहन निर्मितीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मात्र, शहर दुसऱ्या क्षेत्रात नाव कमावत आहे….
