खुशखबर..! महाराष्ट्रात पुन्हा पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त..
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही रविवारी राज्यातील जनतेला दुहेरी दिलासा दिला आहे. केंद्राच्या निर्णयानंतर एका दिवसानंतर, महाराष्ट्राच्या उद्धव सरकारने रविवारी पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.08 रुपये आणि डिझेलवरील शुल्क 1.44 रुपये प्रति लिटरने कमी केले. यापूर्वी राजस्थान आणि केरळ सरकारनेही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे….