सोने खरेदी महागणार, डिझेल आणि पेट्रोलच्या निर्यातीवरील करात सुध्दा वाढ..
रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण आणि परकीय चलनाच्या गंगाजळीत झालेली घट या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सोन्याच्या मागणीला आळा घालण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवले. याबरोबरच सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला. ताज्या निर्णयानंतर देशात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, डिझेल, पेट्रोल आणि एटीएफच्या किमतींवर…