ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल फोडून सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास.
कन्नड शहरा जवळच्या धुळे-सोलापुर बायपासवर असलेल्या एका बियर बारचे कुलूप तोडून चोरट्यांनी विदेशी मद्य, संगणक आणि रोख रक्कम असा तब्बल २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अंकुश फकीरराव जाधव यांचे कन्नड शहरा जवळच्या धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर द्वारकामाई बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. १३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जाधव, हॉटेल मॅनेजर गुलाब…
