पुण्यात किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की; सोमय्या पायऱ्यांवरून कोसळले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी पुणे महापालिकाही गाठली. तेथे आधीच भाजपच्या काही कार्यकर्त्यांशिवाय शिवसेनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्की केली….
