पुन्हा दोन हत्येने हादरलं औरंगाबाद; पती-पत्नीचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला, नातेवाईकानेच केली हत्या?
औरंगाबाद शहरात आज सकाळी एक पुंडलिक नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पती आणि पत्नीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या नेमकी केव्हा झाली याचे गूढ असून, दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले आहे. पती शामसुंदर हिरालाल कलंत्री वय -55 वर्षे आणि पत्नी किरण शामसुंदर कलंत्री -45 वर्षे, अशी मृताची नावे आहेत….
