‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.. औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर…