ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्रात विद्यार्थी रस्त्यावर उतरले, मुंबईत शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव, पोलिसांनी केला लाठीचार्ज..

महाराष्ट्रातील अनेक भागात दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. या विद्यार्थ्यांनी मुंबईतील धारावी येथील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचा घेराव केला. शेकडोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अभ्यास ऑनलाइन झाला असताना परीक्षा ऑफलाइन का घेतली जात आहे, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी सांगितले की, सोशल…