फ्लॅट-धारकांना पार्किंगची जागा विकणे बेकायदेशीर; यासंबधीचे अधिकार फक्त सोसायटीला..
रहिवासी सोसायट्यांतील पार्किंगची जागा पूर्णपणे त्या सोसायटीच्या मालकीची असते. त्यामुळे बिल्डरला पार्किंगची मोकळी जागा कोणत्याही सदनिकाधारकाला विकता येऊ शकत नाही. बिल्डरने सदनिकाधारकाला पार्किंगची जागा विकने हे बेकायदेशीर असून याबाबत सदनिका धारकांमध्ये जागृती व्हावी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तर्फे मोहिम राबवण्यात येत आहे. बिल्डरला सोसायटीची जागा विकता येणार नाही असा कायदा १९६३ मध्येच झाला असून…
