बंडखोर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..
महाराष्ट्राचे रोजगर हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या गारखेडा मधील विभागीय क्रीडा संकुलाजवळील संपर्क कार्यालया बाहेर लावलेल्या बॅनरला शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन व्यक्तीनी काळे फासल्यामुळे आज सकाळपासून भूमरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयांवर, घरावर, राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने व तोडफोड करण्यात…