मध्यरात्री मुलीचे अपहरण करून ऊसाच्या फडात लपला; नराधमाला पकडण्यासाठी शेतकऱ्याने पेटवला ऊस..
सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ऊस कामगारांची ३ कुटुंबे बैलगाडीमधून मुक्तेश्वर साखर कारखाना येथून शिवपूर याठिकाणी ऊस तोडण्यासाठी आली होती; शिवपुर हे वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते. सदर कामगार पहाटे ३ वाजेच्या सुमारास ऊस तोडण्यासाठी बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहोचले. यावेळी मुलीच्या वडिलांनी आपल्या ६ आणि १० वर्षे वयाच्या २ मुलींना…