माझ्या औरंगाबाद जिल्ह्याला पाच मंत्री आता बघायला मिळणार ‘अच्छे दिन’; खा. जलील यांचा टोला
गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज ९ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाला असून आज राजभवनावर १८ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये औरंगाबादचे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा सुद्धा समावेश आहे. या मंत्रिमंडळावर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्या जिल्ह्याला आता ‘अच्छे दिन’ बघायला मिळेल…