रेल्वेत महागाईचा फटका, 20 रुपयांच्या चहासाठी 70 रुपये आकारले, बिल सोशल मीडियावर व्हायरल..
20 रुपयांच्या चहासाठी 70 रुपये घेण्याचे कारण भारतीय रेल्वेने दिले आहे. 2018 च्या भारतीय रेल्वेच्या परिपत्रकानुसार ही रक्कम घेण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेने सांगितले की, प्रीमियम गाड्यांमध्ये आरक्षणाच्या वेळी जेवणाचे प्रीबुकिंग न केल्यास, प्रवासादरम्यान सेवा शुल्क भरावे लागेल. 20 रुपयांच्या चहासाठी 50 रुपये सेवा शुल्क आकारले जात असल्याची तक्रार एका रेल्वे प्रवाशाने केली आहे….