लाऊडस्पीकर वाद: मनसे नेत्यांचा महाराष्ट्र सरकारला इशारा, राज ठाकरेंवर कारवाई झाल्यास आंदोलन करू..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरविरोधात केलेल्या भाषणावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता आमच्या पक्षप्रमुखांवर यापुढे कारवाई झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मशिदींतील लाऊडस्पीकर…