वैजापूरच्या शिवसेना आमदारावर भावजयीचे गंभीर आरोप! गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागितली इच्छामरणाची परवानगी..
वैजापूरच्या राजकारणामध्ये कौटुंबिक वादामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदारावर त्यांच्या भावजयीने गंभीर आरोप केले असून, गृहमंत्र्यांना पत्र लिहून त्यात इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आमदार रमेश बोरणारे आपल्याला वारंवार धमकावून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे, आणि हा त्रास आता असह्य झाल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे पत्र लिहिणाऱ्या महिलेचे नाव असून, त्यांनी यापूर्वी…
