शेअर बाजारात भूकंप ! सेंसेक्सची तब्बल 1545.67 अंकानी घसरण, हजारो कोटींचे नुकसान.
मागील काही काळापासून शेअर बाजार वाईट काळातून जात आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक घसरले. सेन्सेक्स 1545.67 अंकांच्या घसरणीसह 57,491.51 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 468.05 अंकांनी घसरला आणि 17,149.10 वर आला. गेल्या…
