समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारणार? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य.
• छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांच्या टिप्पणीने खळबळ, भाजपसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी घेतला आक्षेप. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सोमवारी आक्षेप घेतला. या नेत्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या नावाचाही समावेश आहे. कोश्यारी यांच्या विधानावर आक्षेप घेत…
