प्रवाशी बसवण्यावरून खाजगी बस वाहतूक आणि रिक्षा चालकामध्ये वाद, बस चालकाने रिक्षा चालकास चिरडले..

औरंगाबाद, 7 मार्च :(ABDnews) रविवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान बाबा पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली प्रवाशी बसवण्यावरून ऑटोचालक अविनाश मगरे आणि ट्रान्सपोर्टच्या खाजगी बस चालकामध्ये एक प्रवासी बसवण्यावरून वाद झाला.

या कारणामुळे बस चालकाने चिडून बस क्रमांक MP 20, EG-3562 ने बाबा पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली रिक्षाचालक अविनाश मगरे याला चिरडले व तो फरार झाला. या घटनेमध्ये रिक्षाचालक अविनाशचा मगरे याचा जागीच मृत्यू झाल्याने रिक्षाचालक वर्ग संतापला आहे.

खासगी बसचालक प्रवाशी वाहतूक करत असल्याचा आरोप करत ऑटो चालक- मालक संघर्ष कार्य समितीने जिल्हाधिकारी, परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिस विभागाकडे अवैध वाहतूक रोखण्यासाठी तक्रार केली होती. मात्र कोणतीही कारवाई न केल्याने पीडितेचा मृत्यू झाल्याचा आरोप निसार अहमद खान यांनी केला आहे.

बस चालकावर कठोर कारवाई आणि बसमालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. या मागणीचे निवेदन पोलिस आयुक्तांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चालकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, ऑटोचालकांनी वाळूज-पंढरपूर रस्त्यावरील ऑटो वाहतूक बंद ठेवून घटनेचा निषेध केला आहे.

Similar Posts