Bank Holiday in September 2023 : सप्टेंबर महिन्यात मध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहतील बंद; दोन हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी…

Bank Holiday in September 2023 :श्रावण म्हणजे सणासुदीचा, सुट्यांबरोबरच आनंदाचा काळ. सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजारांच्या गुलाबी नोटा बदलण्याची शेवटची संधी असल्यामुळे त्यासाठी बँकेत जावे लागेल. पण बँकेत जाण्यापूर्वी बँकेला सुट्टी कधी आहे, हे पाहूनच बँकेत गेल्यास विनाकारणची चक्कर टळेल. सुट्यांचा अंदाज घेऊनच लवकरात लवकर काम पूर्ण करा. RBI (भारतीय रिझर्व्ह बँकेने) ग्राहकांच्या सोयीसाठी वार्षिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात सुट्यांची दखल घेत काम लवकरात लवकर उरकून घ्या.

सप्टेंबर महिन्यात सुट्याच सुट्याच Bank Holiday in September 2023 :
सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना एकूण 16 दिवस टाळे राहील. यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यातील सुट्यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यानुसार या सुट्यांमध्ये फरक सुद्धा असतो. एखाद्या राज्यात सुटी असली तरी दुसऱ्या राज्यात त्या दिवशी बँकेचे कामकाज सुरु असते. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद-उल-नबी या दिवशी काही राज्यांमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे बँकेचे काम लवकरात-लवकर उरकून करुन घ्या.

या दिवशी राहतील बँका बंद

  • 3 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे शटर डाऊन राहील
  • 6 सप्टेंबर 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा)
  • 7 सप्टेंबर 2023 : जन्माष्टमी / श्री कृष्ण अष्टमी (देशातील बहुतेक ठिकाणी सुट्टी)
  • 9 सप्टेंबर 2023 : दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील
  • 10 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँक बंद असेल
  • 17 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे शटर क्लोज असेल
  • 18 सप्टेंबर 2023 : विनायक चतुर्थी (बंगळुरु, हैदराबाद)
  • 19 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी)
  • 20 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस), भुवनेश्वर, पणजी
  • 22 सप्टेंबर 2023 : श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, तिरूवनंतपुरम)
  • 23 सप्टेंबर 2023 : चौथ्या शनिवारमुळे बँका असतील बंद
  • 24 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे कामकाज होणार नाही
  • 25 सप्टेंबर 2023 : श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटी)
  • 27 सप्टेंबर 2023 : मिलाद-ए-शरीफ (जम्मू, कोची)
  • 28 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी (बारा वफत)
  • 29 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार (गंगटोक, जम्मू, श्रीनगर)

मिळेल ऑनलाईन बँकिंगचा लाभ

ऑनलाइन बँकिंगच्या सेवेमुळे ऑनलाईन पद्धतीने रक्कम हस्तांतरीत करता येईल. मात्र त्यासाठी बँकेचे नियम आहेत. त्यानुसार, मर्यादीत स्वरूपातच रक्कम हस्तांतरीत करता येईल. सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता किंवा काढता येणार नाहीत. परंतु ATM मध्ये सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, ATM आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि UPIचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!