Misuse Of PAN Card: तुमच्या PAN Cardचा गैरवापर करून कोणी Loan घेतले आहे का? अशी करा तक्रार..

Misuse Of PAN Card : पॅन कार्ड फसवणुकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. राजकुमार राव, सनी लिओन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या पॅनकार्डवर कर्ज(Loan) घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या सुद्धा पॅनकार्डचा गैरवापर होऊ शकतो.

सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) माध्यमातून तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून कोणीतरी कर्ज घेऊ शकते. हे कर्ज तुमच्या CIBIL स्कोअरला (CIBIL Score) हानी पोहोचवू शकते. तसेच, जर तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर तुम्हाला बँकेच्या डिफॉल्ट यादीत टाकले जाऊ शकते. त्यामुळे गरज असताना पुन्हा कर्ज घेणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पॅनकार्ड तपासणे खूप गरजेचे आहे.

पॅन कार्डचा गैरवापर कसा शोधायचा?
कोणीतरी तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करत आहे की नाही हे तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर तपासणे. तुमच्या पॅनकार्डवर अशा कर्जाची माहिती आढळल्यास, जी तुम्ही घेतलेली नाही, तर त्वरित सायबर क्राईममध्ये तक्रार करा.

CIBIL स्कोअर कसा तपासायचा?
तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर Credit Mantri, Equifax, Experian,Paytm, BankBazaar Or CRIF High Mark सारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत तपासू शकता. (Chake Your CIBIL Score Free)

तुम्ही यापैकी कोणतेही एक प्लॅटफॉर्म उघडा. यानंतर, ‘चेक क्रेडिट स्कोर’ हा पर्याय निवडा. तुम्ही CIBIL स्कोअर मोफत तपासू शकता. यानंतर, तुम्हाला तपशीलवार माहिती द्यावी लागेल, त्यानंतर घेतलेल्या कर्जांची यादी दिसेल.

तक्रार कशी करायची?
पॅनकार्डचा गैरवापर झाल्यास त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. तुमच्या पॅनकार्डच्या गैरवापराची तक्रार कशी करायची हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. भारत सरकारने एक वेबसाइट विकसित केली आहे. तुम्ही अशी तक्रार करू शकता-

1. सर्वप्रथम, TIN NSDL च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
2. नंतर होम पेजवर ग्राहक सेवेवर जा.
3. आता ड्रॉप डाउन सूचीमधून तक्रार पर्याय निवडा.
4. तक्रारीचा संपूर्ण तपशील प्रविष्ट करा.
5. कॅप्चा कोड प्रविष्ट करणे आणि सबमिट करा.

Similar Posts