औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया यांनी पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे मा. महामहिम राष्ट्रपती यांच्याकडुन शौर्य पदक जाहिर…..

Due to the elimination of five Jahal Naxalists, Hon. Awarded Shaurya Medal by His Excellency the President: औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया हे सप्टेंबर/२०१९ ते सप्टेंबर/२०२१ या दरम्यान गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of police म्हणुन कार्यरत होते.

दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी नक्षल विरोधी (Anti-Naxalite) अभियान राबवित असतांना महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सिमेवर किसनेली गावाजवळ ६० ते ७० नक्षल असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री. मनिष कलवानिया, यांच्या नेतृत्वात सी-६० कमांडो पथकासह १५ किमी घनटाद जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबवित असतांना नक्षलांनी त्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केल्यामुळे प्रत्युतरात पोलीसांनीही गोळीबार सुरू केला. यावेळी मा. मनिष कलवानिया, यांचे सह त्यांचे सी-६० कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षलवाद्यांशी झुंज दिली.

सदर ठिकाणी पोलीस आणि नक्षलवाडी यांची ८ तास भीषण चकमक चालली. (8 hour fierce encounter between police and Naxalwadi) यामध्ये पोलीसांचा वाढता दबाब पाहुन तेथून नक्षलवादी पसार झाल्यावर त्या ठिकाणची पाहणी केली असता तेथे ०५ जहाल नक्षलींचे मृतदेह तसेच मोठया प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, कुकर बॉम्ब स्फोटके व ईतर नक्षली साहित्य ही मिळुन आले होते.

सदर अभियानामध्ये मा. मनिष कलवानिया, तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली व सोबत त्यांचे सी-६० कमांडो पथकाने यांनी टिपागड दलम, कोरची दलम, आणि प्लाटुन १५ मधील जहाल नक्षलवादीना टिपण्यात यश आले होते. सदर चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयावर १८ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. (A reward of 18 lakhs was placed on the Naxal who was killed in the said encounter)

सदर साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणा-या शौर्यपूर्ण कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन “शौर्य पदक” Gallantry Medal जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!