विनायक मेटे यांचं अपघाती निधन..! मराठा आंदोलनाचा आवाज काळाच्या पडद्याआड..
Accidental death of Vinayak Mete..! शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचे रस्ता अपघातात निधन झाले. आज रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर खोपोलीजवळ एसयूव्ही कारमधून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला.
शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचा रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्रातील रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. (A meeting of the Maratha Coordination Committee was organized today. He was coming to Mumbai from Pune for this meeting ) यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटे यांचा चालक ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.
गाडीच्या डाव्या बाजूस धडक, गाडीचा चक्काचूर, अपघातानंतर १ तास मदत मिळाली नाही..
गाडीत विनायक मेटे ज्या बाजूला बसले होते, बाजूला मोठ्या गाडीने जोरदार धडक दिली व आमची गाडी अंतर ओढत नेली. त्यामुळे विनायक मेटे यांना जोरदार मार बसला. अपघातानंतर आम्ही मदतीची प्रतीक्षा करत होतो, पण आम्हाला तासभर वैद्यकीय मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे.
मराठा समाजाला मोठा धक्का (A big shock to the Maratha community)
विनायक मेटे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे समर्थक होते. मेटे हे मराठा समाजासाठी काम करण्यासाठी ओळखले जात होते, त्यांच्या निधनाने या समाजाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मेटे हे तीन वेळा आमदार होते.
विनायक मेटे कोण होते ..? (Who was Vinayak Mete..?)
● विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
● मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
● मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
● अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
● बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
● सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
● त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य