Bank Auction Second hand car : काय सांगता? गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर फक्त 1 लाखात मिळणार कार आणि 15 हजारात बाईक आणि स्कूटी!

Bank Auction Second hand car: लोक नवीन कार घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात परंतु पैशांच्या कमतरतेमुळे ते कर्ज फेडू शकत नाहीत, म्हणून बँका लोकांच्या कार जप्त करतात. मग बँकेद्वारे या कार विकून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वीच्या मालकाने भरलेले काही हप्ते वजा करून बँक कमी किमतीत कार विकते. मात्र आता कमी किमतीत वाहन खरेदी करण्याची अशीच एक सुवर्णसंधी बँकेने आता तुम्हाला दिली आहे.

नवीन वर्षाची सुरुवात मराठी महिन्याप्रमाणे गुढीपाडव्यालाच होते. आणि बरेच जण वर्षाच्या सुरुवातीला नवीन वाहन किंवा कार खरेदी करतात. आता गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे यावेळी बाजारपेठेत वाहनांची खरेदी आणि बुकिंग करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांना नवीन वाहन घेणे शक्य होत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा पर्याय आणला आहे जो कमी किमतीत कार घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करेल.

Bank Auction Second hand car

बँकेकडून जप्त केलेल्या कार येथे खरेदी करा: कमी किमतीत कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे सेकंड हँड कार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँकेकडून होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन सर्वोत्तम कार खरेदी करू शकता. जे बँकेकडून कर्ज तर घेतात मात्र ते फेडण्यास असमर्थ असतात, तेव्हा अशा लोकांची वाहने बँकेकडून जप्त करण्यात येतात. अशा वाहनांचा इंडस इझी व्हील्स प्लॅटफॉर्मवर लिलाव केला जातो. आता यामध्ये मारुती स्विफ्ट 1 लाख रुपये आणि हिरो स्प्लेंडर 34 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुनी वाहने विकण्यापूर्वी त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्य रित्या तपासण्यात येते. अशा वेळी जे लोक जुन्या गाड्या खरेदी करणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करण्याची गरज भासत नाही. कार देखो ते कारवाले पर्यंत, आणि OLX, Car 24 सारख्या ब्रँड्सनी या मार्केटमध्ये खूप प्रगती केली आहे. Bank Auction Second hand car

आता लोकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच ब्रँडने वापरलेल्या कारच्या बाजारपेठेतून मोठा व्यवसाय केला आहे. शिवाय, लोक आता मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्व माहिती ऑनलाइनच तपासतात.

कार बँकेच्या लिलावातून कशी खरेदी कराल:

बऱ्याचवेळा बँकांकडून लोकं कार लोन किंवा गृहकर्ज घेतात पण त्या कर्जाची परतफेड करणं त्यांना शक्य होत नाही. परिणामी लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता बँकेद्वारे जप्त केल्या जातात. मग बँके द्वारे या गाड्या किंवा मालमत्ता विकून नुकसान (Bank Auction Second hand car) भरून काढण्याचा प्रयत्न करताना त्या गाड्यांचा लिलाव करण्यात येतो.

अनेक महागड्या गाड्या यामुळे तुम्हाला कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात. मालमत्तेच्या लिलावादरम्यान (Bank Auction Second hand car) तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.

सर्वात मोठा फायदा काय होईल?

बँकेच्या लिलावाद्वारे कार विकत घेण्याचे अनेक फायदे आहेत, कारण तुम्हाला केवळ वाजवी किंमतीत चांगली कार मिळत नाही, तर तुम्हाला नोंदणीसह कोणत्याही कागदपत्रांचा त्रास सहन करावा लागत नाही. बँक कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे खरेदीदारांना देते. रिअल इस्टेटच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात, परंतु बँक सर्व कागदपत्रांचे काम सोपे करते.

मी कार किंवा मालमत्ता कशी खरेदी करालं ?

जर तुम्हाला बँकेमार्फत लिलावात कार किंवा घर घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही थेट बँकेशी संपर्क साधावा. कारण, परत ताब्यात घेणे किंवा लिलाव विभाग हा अनेक बँकांमध्ये असतो ज्याद्वारे बँकेने जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकली जातात. आम्ही तुम्हाला सांगतो की रिअल इस्टेट किंवा कार “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म सारख्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जातात. यावेळी तुम्ही ते विकत घेण्यासाठी बोली लावू शकता.

जर लोकांनी बँकेने दिलेल्या कार आणि दुचाकी कर्जाचे हप्ते चुकवले तर त्यांची वाहने जप्त केली जातील. बँके द्वारे आता जप्त केल्या गेलेल्या अनेक वाहनांची विक्री होत आहे. तर, अशा वेळी जर तुम्ही इच्छुक असाल तर आपण अगदी कमी किमतीत चारचाकी आणि दुचाकी विकत घेऊ शकता. तुम्हाला कारच्या किमतीच्या फक्त 30 टक्केच पैसे द्यावे लागतील, म्हणजेच जर कारची किंमत 10 लाख रुपये असेल तर ती तुम्हाला 3 लाख रुपयांना मिळेल. Bank Auction Second hand car

बँक तुम्हाला अनेक सेवा देखील पुरवते. यामधे वाहनाची संपूर्ण कागदपत्रे आणि एनओसी प्रमाणपत्र दिले जाते. याशिवाय, वाहन कर्ज, वाहन विमा, वाहन सेवा आणि गो मेकॅनिक सेवा देखील प्रदान केल्या जातात. तुम्ही Indus Easy Wheels वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण लिलाव पाहू शकता. येथे तुम्हाला अनेक ऑफर्स सुद्धा बघायला मिळतील. आजकाल हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!