Gharkul Yojana Helpline Number: अद्याप घरकुल मिळाले नाही? केंद्र सरकारच्या या नंबरवर करा कॉल, त्वरित मिळेल हक्काचं घर!
Gharkul Yojana Helpline Number: आज आपण सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला घरकुल मिळाले नसेल किंवा घरकुल शोधण्यात समस्या येत असेल, किंवा घरकुलशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही प्रश्नांसाठी सरकारकडून हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे.
Gharkul Yojana Helpline Number काय आहे? आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. देशात अजूनही अनेक कुटुंबे गरीब आहेत हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यांना अजूनही घर मिळू शकलेले नाही, अशा स्थितीत केंद्र सरकारने गृहनिर्माण योजना लागू केली आहे. नागरिक या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या साहाय्याने घरे बांधतात.
मात्र या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांसाठी तुम्ही घरकुलाच्या हेल्पलाइन क्रमांका(Gharkul Yojana Helpline Number)वर तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्हाला काही माहिती हवी असल्यास ती देखील मिळवू शकता. चला तर मग त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Gharkul Yojana Helpline Number
2011 च्या जनगणनेच्या यादीत नाव नसल्याने ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, याशिवाय अनेक फॉर्म नाकारले सुद्धा जातात. मात्र याबाबत त्यांना माहिती नसल्याने ते गृहनिर्माण योजनेचे अनुदान मिळण्याची वाट पाहत आहेत. अशा सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून त्याद्वारे नागरिकांना आता त्यांच्या मोबाईल फोनवर गृहनिर्माण योजनेशी संबंधित सर्व माहिती मिळू शकेल.
घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्यास काय करावे?
घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असतानाही, आणि तुमचे नाव 2011 च्या जनगणनेच्या यादीत असून देखील जर घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला नसेल तर त्यासाठी तुम्ही, आमच्याद्वारे पुढे दिल्या गेलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून त्याबाबतची तक्रार नोंदवू शकता.
घरकुल योजना टोल फ्री क्रमांक | Gharkul Yojana Helpline Number
यासाठी सर्वप्रथम घरकुल योजनेच्या नवीन यादीतील नाव तुम्हाला तपासावे लागेल. घरकुल योजनेची यादी तपासण्याची सोपी पद्धत तुम्हाला देण्यात आली आहे. घरकुल यादी कशी पहावी याची माहिती खाली दिली आहे. यादीतील नाव पाहण्यासाठी खालील माहिती नीट वाचा. घरकुल योजनेच्या तक्रारींसाठी केंद्र सरकारकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. घरकुल योजनेसाठी खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकाची मदत घ्या.
- ग्रामीण हेल्पलाइन क्रमांक – 1800116446
- टोल फ्री क्रमांक – 1800118111
- अर्बन हेल्पलाइन क्रमांक – 1800113377
- अर्बन हेल्पलाइन – 1800116163
- व्हॉट्सॲप मोबाईल नंबर – 7004193202
- दुसरा टोल फ्री क्रमांक – 18003456527
घरकुल योजना याद 2024 ऑनलाइन कशी पहावी? | Gharkul Yojana list check online
तुमच्या मोबाईल फोनवर घरकुल यादी पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- सर्वात आधी खाली दिल्या गेलेल्या घरकुल यादी वेबसाइटच्या https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx लिंकवर क्लिक करा.
- आता प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादीची वेबसाइट तुमच्यासमोर ओपन होईल.
- या ठिकाणी A, B, C, D, E, F, G, H असे अनेक बॉक्स तुम्हाला दिसतील. यामध्ये तुम्हाला F block मधील Beneficiares register, account frozen आणि verified पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला सिलेक्शन फिल्टरमधील वरचे 2 पर्याय आहेत तसेच ठेवायचे आहेत. आता तुम्हाला तुमचे राज्य येथे निवडायचे आहे.
- त्याचप्रमाणे जिल्ह्याचे, तालुका गटाचे, गावाचे नाव निवडायचे आहे. यानंतर कॅप्चर कोड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- आता तुम्हाला घरकुलाची यादी दिसून येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये याची PDF फाईलही डाउनलोड करू शकता.