Ration Dukandar Complaint : रेशन दुकानदाराची तक्रार करण्याचे कारणे खालीलप्रमाणे

Ration Dukandar Complaint : रेशन दुकानदाराची तक्रार करण्याचे कारणे खालीलप्रमाणे

  • रेशन दुकानदार वेळेवर दुकान उघडत नाही, म्हणून तक्रार करता येते.
    व्यवस्थित मोजून रेशन देत नाही म्हणजे मापात पाप करतो, म्हणून तक्रार करता येते.
  • घेतलेल्या धान्याची पावती सुद्धा देत नाही, म्हणून तक्रार करता येते.
  • आकारलेल्या भावापेक्षा जास्तीचे पैसे घेतो, म्हणून तक्रार करता येते.
  • मोफत असलेले धान्य तुम्हाला न देता बाजारात बेकायदेशीररित्या विकतो, म्हणून तक्रार करता येते.
  • राज्य शासनाने धान्याची ठरवलेली किंमत सांगत नाही, म्हणून तक्रार करता येते.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण रेशन आले की नाही याची माहिती देत नाही. म्हणून तक्रार करता येते.
  • धान्याचे सरकारी भाव फलकाची पाटी दुकानात लावलेली नाही, म्हणून तक्रार करता येते.
  • तक्रार करण्याची नोंदवही दुकानात ठेवत नाही, म्हणून तक्रार करता येते.
  • रेशन घ्यायला गेल्यावर उद्धटपणे बोलतो म्हणून तक्रार करता येते.
  • रेशनच्या धान्याचे वेळेवर वाटप करत नाही, म्हणून तक्रार करता येते.

दुकानदार विरोधात तक्रार कशी करावी जाणून घ्या..

महाराष्ट्र राज्यात रेशन कार्ड संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक – 1967 / 1800224950
रेशन संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन वेबसाईट – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या ब्राउझर https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx ही वेबसाईट ओपन करा
  • तुमच्यासमोर अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ओपन होईल
  • यावर उजव्या साईडला एक सूचना फलक नावाचा पर्याय दिसेल, त्याच्या खाली ऑनलाइन सेवा नावाचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. Ration Dukandar Complaint
Ration Dukandar Complaint

यात तुम्हाला पाच पर्याय दिसतील.

१) ऑनलाइन रास्त भाव दुकाने.
२) ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली.
३) ऑनलाइन PDS वितरण प्रणाली.
४) ऑनलाइन e-jawaab प्रणाली.
५) ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली.

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

● या सर्व पर्यायमधून दुसऱ्या नंबरचा पर्यायावर क्लिक केल्यास एक वेबसाईट ओपन होईल,
● या वेबसाईटवर तुमची तक्रार नोंदवा नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

Ration Dukandar Complaint

आता तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा Ration card नंबर, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका ही सर्व माहिती भरायची आहे आणि तक्रार सबमिट करायचे आहे

Similar Posts