PM Surya Ghar Yojana 2024: आता दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज; पंतप्रधान मोदींनी सुरू केली नवीन ‘पीएम सूर्य घर’ योजना..!

PM Surya Ghar Yojana 2024: भारतात सौरऊर्जेला चालना देण्याकरिता भारताचे पंतप्रधान मनानिय नरेंद्र मोदी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घोषणा केली की केंद्र सरकार ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करत असून एक कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे.

PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar Yojana

पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्ट करत ही घोषणा केली. ते म्हणाले की, “शाश्वत विकास आणि नागरिकांच्या कल्याणाकरता आम्ही “पीएम सूर्य घर मोफत वीज योजना” सुरू करत आहोत.” (Rooftop solar programme announced in Budget named ‘PM Surya Ghar: Muft Bijli Yojana’)

काय आहे PM Surya Ghar Yojanaचा उद्देश ?

या प्रकल्पामध्ये 75 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार भारतीय 1 कोटी घरातील नागरिकांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीजेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदीजी म्हणाले की, ही योजना तळागाळमध्ये लोकप्रिय करण्याकरता, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींच्या अधिकार क्षेत्रामध्ये रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्याकरता प्रोत्साहित करण्यात येईल.

रोजगाराला मिळेल चालना

या योजनेची अंबलबजावनी करत असताना लोकांचे उत्पन्न वाढण्याबरोबर, वीज बिल कमी तर होईलच शिवाय रोजगार निर्मिती सुद्धा होईल, असे पंतप्रधान यांनी स्पष्ट केले.

सौरऊर्जा व शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्याकरता ‘https://pmsuryaghar.gov.in/‘ या संकेस्थळावर अर्ज करून पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना, विशेषत: देशातील तरुणांना PM सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. (PM Modi Launches ‘PM Surya Ghar Muft Bijli Yojana To Lighten One Crore Homes With Solar Power)

PM Surya Ghar Yojana साठी अर्ज कसा कराल?

  • या नवीन योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
  • तुम्ही नोंदणी केल्यावर तुमचे एक नवं खाते तयार केले जाईल.
    तेथे लॉग इन केल्यावर तुम्हाला वीज ग्राहक नंबर, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी यांसारखी माहिती विचारण्यात येईल, जी तुम्हाला अपलोड करून सबमिट करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला सरकारतर्फे तुमच्या परिसरातील विक्रेत्यांची नोंदणीकृत यादी मिळेल, यादीतील तुमच्या जवळचा विक्रेता निवडल्यावर, तुमचा अर्ज मंजुरीकरता डिस्कॉमकडे पोहोचेल.
  • डिस्कॉम ने मंजुरी देताच, तुम्ही सोलर प्लांट बसवू शकता. सोलर प्लांट बसल्यावर तुम्हाला तुमच्या प्लांटचा तपशील योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करून नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.
  • तुम्हाला फक्त अधिकृत पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक (कॅन्सल चेक) सबमिट करावा लागेल.

योजनेची पात्रता

  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय रहिवाश्यांनाच मिळणार आहे.
  • या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
  • अर्ज करत असताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वीज बिल
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड

Similar Posts